Friday, 11 March 2016

'माझं घर....Women's Day Special

'माझं घर....

----

चांगलं झालं ड्राय बाल्कनी आहे घराला..., अरे ते पाहिलं ना किचन अगदी परफेक्ट आहे ते... रूम्स देखील पुरेशा मोठ्या आहेत. झालं घर फायनल आता. हे सर्व विचार ‘तिच्या’ मनातले आहेत... एखादं घर घेत असताना ते एका घरातल्या स्त्रीच्या दृष्टीने परफेक्ट असायलाच हवे. घराला घरपण एक स्त्रीच देते. त्यामुळे आपले घर निवडताना ती खूप
बारकाईने पाहते, विचार करते. आणि मगच आपलं मत देते.स्वयंपाकघरात हवी तशी सोय आहे का?, हवी तशी जागा आहे का?,घर हवेशीर आहे की नाही हे सर्व बघूनच ती घरखरेदीचा निर्णय घेते.पाहूया अशा कुठल्या गोष्टी आहे ज्यामुळे तिला घरकुल हवेहवसे वाटते...

१. एैस-पैस स्वयंपाकघर :

स्त्रीसाठी घरात सर्वात महत्वपूर्ण ठिकाण म्हणजे स्वयंपाकघर. आजचीस्त्री स्वयंपाकघरात जरी आपला सगळाच वेळ घालवत नसली तरी सुद्धा तिला तिचं स्वयंपाकघर अगदी तिला हवं तसं हवेशीर, मोकळी जागा असलेले आणि सगळ्या सोई-सुविधांनी युक्त असं हवं...त्यामध्ये सोईच्या ठिकाणी ‘इलेक्ट्रिसिटी स्विचेस’ असायला हवेत. जेणेकरुन ‘फ्रीज’ ‘माइक्रोवेव्ह’ आणि ‘मिक्सर’ सोईस्करिरत्या ठेवता येईल.विविध सामान ठेवण्यासाठी केलेले कप्पे, ‘मॉड्यूलर किचन‘, ‘क्रॉकरी’साठी वेगळे कपाट अशा सर्व सुविधा स्वयंपाकघरात असायलाच हव्यात. नवीन घर घेताना जागेनुसार काय कुठे  ठेवायचे हे गणित तिच्या मनात आधीच पक्के असते.

२. ड्राय बाल्कनी :

काळ बदलला तसे घर बांधणाच्या पद्धतीत आणि प्रकारांमध्ये देखील बदल झाला. सध्या घरांमध्ये ड्राय बाल्कनीचा ट्रेंड दिसतो. स्वयंपाकघराला लागूनच ही बाल्कनी असते. यामध्ये धुणी- भांडी करण्याची व्यवस्था, धुतलेले कपडे वाळत घालण्याची व्यवस्था असते. छोटी झाडे, रोपटे ठेवून या ‘ड्राय बाल्कनी’ला सुंदर सजवता येवू शकते. ही बाल्कनी स्त्रियांच्या दृष्टीने खूप महत्वाची असते.

३. बेडरूम :

घरातील इतर भाग जितके महत्वाचे असतात, तितकीच किंबहुना त्याहून जास्त महत्वाची खोली बेडरूम असते. येथे आल्यावर दिवसभराचा थकवा निघून जावा असे वाटले पाहिजे. यासाठी खोलीचा रंग, आवडीनुसार पलंग,  कपाटांचे ठिकाण, पुस्तक वाचण्याची आवड असलेल्यांनी खिडकी जवळच आरामात बसण्यासाठी एक विशेष जागा असे सगळे विचारात घेवून ती आपली खोली सजवते. त्यामधील पडदे, भिंतींचे रंग कुठले असतील, कपाटं कुठे असतील, बेड कुठल्या प्रकारचा असेल. हे सर्व डोक्यात ठेवून झोपण्याच्या खोलीची निवड करण्यात येते. आणि जर झोपण्याची खोली हवी तशी नसली तर ते घर घेणे ‘कॅन्सल’ सुद्धा हवू शकते बरं का...

४. मोकळी जागा आणि हवेशीरपणा :

घर जर खूप सुटसुटीत नसेल तर ते तीला कधीच आवणार नाही. घर हे हवेशीर असले पाहीजे. यामध्ये ‘क्रॉस व्हेंटिलेशन’ला जागा आहे की नाही. आरामशीर खिडक्या आणि सुंदर बाल्कनी आहे की नाही. या सर्व गोष्टींकडे घरातील महिलेचे बारकाईने लक्ष असते. घराच्या आजूबाजूला थोडी मोकळी जागा असणे, त्यामध्ये आवडीनुसार छोटी बाग करणे किंवा घरासमोरच्या जागेत झोपाळा लावणे ही छोटी छोटी स्वप्न प्रत्येकाच स्त्रीच्या मनात असतात. आणि नवीन घर घेत असताना आपले प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे असे देखील तिला वाटणे साहाजिक आहे. म्हणून मोकळी जागा आणि हवेशीरपणा घरात असणे महत्वाचे आहे.

५. सुरक्षा :

महिलांच्या दृष्टीने सुरक्षा हा सर्वात महत्वाचा मुद्दा असतो. नवीन फ्लॅट असल्यास तो सुरक्षित प्रकल्पांमध्ये आहे की नाही, शेजार चांगले आहे की नाही. सोसायटी पर्यावरण पूरक हे का, तेथे विविध सुख सुविधा आणि सुरक्षेची व्यवस्था आहे की नाही या सर्व गोष्टींकडे महिलांचे मु‘य लक्ष असते. सुरक्षा असल्याशिवाय ते घर कितीही चांगले असले तरी ती हो म्हणणारच नाही.

७. लॉन किंवा बागेसाठी जागा :

स्त्रियांना निसर्गाविषयी विशेष प्रेम असते. आपल्या घरात छोटी बाग, किचन गार्डन, किंवा संध्याकाळी चहा पिण्यासाठी एखादा छोटा लॉन असणे तीचे स्वप्न असते. त्यामुळे घर घेताना जर अशी जागा असेल तर ते घर ‘फायनल’ झालंच म्हणून समजा. जर घर समृद्ध ठेवायचे असेल तर त्यात घरातील स्त्री आनंदी असणे खूप आवश्यक असते. घराला घरपण देण्यासाठी या काही गोष्टींकडे स्त्रियांचे बारकाईने लक्ष असते आणि या महत्वाच्या गोष्टींना डोळ्या समोर ठेवूनच ती घर घेण्यासाठी राजी होते.

ईश्‍वर परमार ग्रुपचे ‘कुटुंबकेंद्रित’ प्रकल्प याशिवाय तिच्या चिमुकल्यांना खेळण्यासाठी जागा,बाजारपेठ,हॉस्पीटल,शाळा, कॉलेज ही दररोजची आवश्यक ठिकाणे सुद्धा जवळ असणे घरातल्या स्त्रीला अपेक्षितच असतात. ती तिच्या अपेक्षांशी तडजोड कधीच करीत नाही. आणि मी देखील एक महिला म्हणून सर्वांगिण विचार करूनच मी माझ्या प्रकल्पांमधील घरांची रचना, तिथल्या सुख-सुविधांचा निर्णय घेते. एक महिला म्हणून मी स्वतःला भाग्यशाली समजते की, घराची उभारणी करताना मी माझ्यासारख्या असंख्य ‘कर्तव्यदक्ष’ सखींचा विचार करते याचा...एका महिलेने वरती व्यक्त केलेल्या सर्व अपेक्षा तुम्हाला ‘ईश्‍वर परमार ग्रुप’ प्रकल्पांमधून असताना वा पूर्ण होत असताना दिसतील. ‘रिव्हर रेसिडन्सी’ प्रकल्पातही या व यासारख्या आवश्यक इतर सर्वच सुविधांचा विचार केला गेला आहे.

No comments:

Post a Comment